राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने आयोजन
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या शेखर ओव्हाळ हे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठे नेते आझम पानसरे यांची ग्रंथतुला करून त्यांचा सोमवारी (दि. २२) सन्मान करणार आहेत. तसेच शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते केला जाणार आहे.
शेखर ओव्हाळ युवा मंचच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्या हस्ते पिंपरीचे शिलेदार या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. ते राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. अजितदादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून ते राजकीय वातावरण निर्मितीवर भर देणार आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची ग्रंथतुला करण्याचा निर्णय घेऊन बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे.
- दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांना मानपत्र देऊन सत्कार, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, इयत्ता दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता मोहिम, एक कुटुंब एक रोप, असे रोपवाटप तसेच स्वयंरक्षणार्थ युवतींना प्रशिक्षण तसेच महिलांसाठी होममिनिस्टर, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहरातर्फे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता १० वी ब इयत्ता १२ बीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.