निर्भीडसत्ता न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 व 2019 च्या लोकसभा निवडूकीत सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावीपणे वापर करत देशावर एकहाती सत्ता मिळवली. आता त्यापुढे जाऊन पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशवासीयांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ई-मेलद्वारे ग्रिटिंग पाठवून वैयक्तीक शुभेच्छा देण्याचा अनेखा उपक्रम राबवला जात आहे.
मात्र, त्यासाठी www.narendramodi.in या वेबसाइटवर नोंदणी असणे गरजेची आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपले नाव असलेले ग्रिटिंग थेट पंतप्रधान त्यांचा फोटो व स्वाक्षरीसह पाठवत असल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसतो. हे ग्रिटींग सोशल मी़डियावर संबंधिताकडून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असून त्याला पुष्कळ लाईकही मिळतात.
शुभेच्छा प्राप्त होण्यासाठी प्ले-स्टोअरवर उपलब्ध असलेल्या नरेंद्र मोदी मोबाईल ऐप किंवा नरेंद्र मोदी डॉट इन या वेबसाइटवर नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणीच्या वेळी नाव, जन्म तारिख, फोन नंबर, ई-मेल आयडी आदी माहिती विचारली जाते. या माहितीच्या आधारावर नोंदणीधारकाला त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा प्राप्त