निर्भीडसत्ता न्यूज- बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे हे आता आमचं स्वप्न आहे असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सचिन अहिर यांचं उद्धव ठाकरेंनी स्वागत केलं. राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. पक्ष फोडणं ही शिवसेनेची वृत्ती नाही, आम्ही आमच्या कामाने शिवसेना वाढवली आहे. मला फोडलेली माणसं नकोत, मनं जिंकलेली माणसं हवी आहेत.