निर्भीडसत्ता न्यूज । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर ओव्हाळ यांनी घेतला अर्ज
पिंपरी विधानसभा मतदारसंघात दुसर्या दिवशी सोमवारी (दि.30) 33 जणांनी तब्बल 90 अर्ज घेतले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनीही आज अर्ज घेतला.
पिंपरी मतदारसंघाच्या प्राधिकरण, निगडीतील डॉ. केशवराव हेडगेवार भवनातील कार्यालयातून अर्ज वाटपास शुक्रवारी (दि.27) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी तब्बल 31 अर्ज नेण्यात आले. तर, शनिवारी (दि.28) व रविवारी (दि.29) सुटी होती. दुसर्या दिवशी आज कार्यालयातून एकूण 90 अर्ज नेले गेले.
त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी प्रत्येकी 4 अर्ज घेतले आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांनी 4, नगरसेवक राजू बनसोडे यांनी 2 आणि उत्कर्ष शिंदे यांनी 1 अर्ज घेतला.
शिवसेनेकडून नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी 4 अर्ज नेले. भाजपकडून माजी नगरसेवक राजेश पिल्ले,भीमा बोबडे व तेजस्विनी कदम यांनी प्रत्येकी 4 आणि अमित गोरखे यांनी 1 अर्ज नेला. मनसेकडून शाम घोडके व अनिल शिंदे यांनी प्रत्येकी 2 अर्ज घेतले. काँग्रेसकडून सुंदर कांबळे यांनी 3 अर्ज नेले. शेकापकडून दिलीप पवार यांनी 1 अर्ज नेला.
तसेच, विजय ओहोळ (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), दीपक अंकुश (बहुजन मुक्त पार्टी), संदीक कांबळे (भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी), विजय रंदील (बहुजन महापार्टी), धनराज गायकवाड (बहुजन समाज पार्टी), चंद्रकांत माने (वंचित बहुजन आघाडी), डॉ. राजेश नागोसे (राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी), जीवन कांबळे (बहुजन समाज पक्ष), गणेश गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), अनिता साबळे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), बाळासाहेब जगताप (वंचित बहुजन आघाडी) यांनी अर्ज घेतले.
तर, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, हेमंत मोरे, अरूण कांबळे, डॉ. अभिजीत भालशंकर, विजय गेडाम, जीवन भोसले, सतीश भोवाळ, नागप्पा मंत्री यांनी अपक्ष म्हणून अर्ज नेले आहेत. तर, अपक्ष म्हणून अजय लोंढे यांनी 2 उमेदवारी अर्ज आज दाखल केले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी दिली.