निर्भीडसत्ता न्यूज –
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने 125 उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. तर 52 जागांवर सिटींग उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील आठही जागांवर भाजपचेच उमेदवार असणार आहेत. शिवसेनेला हडपसर, कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघ सुटण्यासाठी अशा होती. मात्र शिवसेनेला पुण्यात ठेंगा मिळाला आहे.
पहिल्या यादीनुसार वडगाव शेरी – जगदीश मुळीक, शिवाजीनगर – सिद्धार्थ पद्माकर शिरोळे, कसबा पेठ – मुक्ता टिळक, हडपसर – योगेश टिळेकर, पुणे कान्टोन्मेंट सुनिल कांबळे, कोथरूड – चंद्रकांत पाटील, पर्वती – माधुरी मिसाळ, ख़डकवासला – भिमराव तपकीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेला हडपसर मतदारसंघ मिळेल अशी आशा होती. मात्र भाजपने सिटींगचे सुत्र लावत हडपसरची जागा स्वतःकडे ठेवत योगेश टिळेकर यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभेसाठी युतीचा फॉर्म्युला ठरला असून यात भाजपला 146, शिवसेनेला 124 तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात य़ेणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघाची उमेदवारी देऊन पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा प्लॅन भाजपने आखला आहे.