निर्भीडसत्ता न्यूज |
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज संपूर्ण पिंपरीगाव परिसरात पदयात्रा काढून नागरिकांच्या भेटी घेतल्या.
आज सकाळी साडेदहा वाजता पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ॲड. चाबुकस्वार यांनी पदयात्रेला सुरूवात केली. भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे, गोकूळ भुजबळ, दत्ता वाघेरे, राजाराम कुदळे, बबलू सोनकर, माधव मुळे, विष्णू साळवी, गणेश आहेर, माऊली नागणेकर, अनुजा कुमार, डॉ. वैशाली कुलथे, विभागप्रमुख अनिल पारचा आदी यावेळी उपस्थित होते.
वाघेरे कॉलनी, तपोवन मंदीर, वैभवनगर, माळी आळी, नवमहाराष्ट्र महाविद्यालय, पिंपरी गावठाण आदी परिसर आमदारांनी पिंजून काढला.