निर्भीड सत्ता न्यूज
नुकताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे एकत्रीकरण करण्याच्या ठरावाला मान्यता देण्यात होती. यावर राष्ट्रवादीच्या ज्ञानेश्वर कस्पटे यांनी आक्षेप घेतला असून या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात निवेदन दिले असून याची प्रत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागालाही दिली आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या एकत्रीकरणामुळे विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होऊन गुणवत्ता खालावण्याची भीती पालक वर्गात आहे. यामध्ये अनेक त्रुटी असूशकतात त्यामुळेच एकत्रीकरण करण्यात आल्याचे एकही उदाहरण राज्यात नाही. इतर राज्यातही नाही. मात्र आपल्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही पडताळणी न करता निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गदा आणणाऱ्या अशा निर्णयाला स्थगिती द्यावी, असे निवेदनात कस्पटे यांनी म्हटले आहे.
टॅबच्या वापरामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार का?
याच बैठकीत ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी कराव्याच निर्णय घेण्यात आला आहे. ही टॅब खरेदी खरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवेल की फक्त ठेकेदारांना पोसण्याचे काम केले जाणार? असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
याआधी २००२-२००३ मध्ये विद्यार्थ्यांना संगणकीकृत ज्ञान मिळावे यासाठी असाच निर्णय घेण्यात आला होता. त्यातून विद्यार्थ्यांना किती फायदा झाला याबाबत आजपर्यंत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सध्या अनेक शाळांमध्ये सिसिटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता असताना, असे निर्णय घेतले जातात ते केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठीच असा आरोप त्यांची केला आहे.