निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी : नगरवस्ती विकास योजना विभाग आणि मे.पुणे सिटी कनक्ट डेव्हलपमेंट फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये जागांच्या उपलब्धतेनुसार रोजगार निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे ६४ कोटी ८७ लाख इतक्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. देहू आळंदी या ३०.०० मी.डी.पी. रस्त्याचे स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या ४५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाय.सी.एम.एच रूग्णालयामध्ये ओटीस उत्पादित लिफ्टची त्रैवार्षिक पद्धतीने देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या ३० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड मनपाच्या विविध विभागांना आवश्यक कॅनॉन कंपनीचे विविध टोनर्स खरेदी करणेकामी येणाऱ्या ३० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ड्राफ्टसमन मेकॅनिकल या व्यवसायाचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक टुल्स किट, इक्विपमेंट व मशिनरी इ. आवश्यक साहित्य खरेदीकामी येणा-या सुमारे २ कोटी ७८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह शहरातील अशा अन्य प्रभागांमधील विकास कामांसाठी एकूण 64 कोटी 87 लाख रुपयांच्या खर्चाच स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.