निर्भीडसत्ता न्यूज
आकुर्डी रेल्वे स्टेशननजीक शुक्रवारी पहाटे धावत्या रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला. गौतमी महेंद्र जाधव ( वय २९, रा. चिखलीगाव ), रवी चंदर पिवाल (वय ३५ रा. विकासनगर, देहूरोड) अशी अपघातातील मयताची नावे आहेत.
पोलिसांची दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पावणे सहा वाजता हा अपघात झाला. मयत गौतमी यांच्या पतीचे निधन झाले आहे. रवी पिवाल यांच्याही पत्नीचे निधन झाले आहे. हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. रेल्वे पोलीस याबाबत तपास करीत आहेत.