निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. महापौर माई ढोरे व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुष्पहार केले.
महापालिकेच्या मुख्य इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्य्क आयुक्त आशादेवी दुरगुडे, आण्णा
बोदडे, सहाय्य्क आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, पर्यवेक्षक दिलीप करंजखेले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणी यांनी केले.