निर्भीडसत्ता न्यूज
निर्भीडसत्ता न्यूज
शहरातील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेता यावा व त्यांच्या क्रीडा विषयक यासाठी आंतर शालेय महापौर चषक स्पर्धा शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले. त्या पिंजारी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाच्यावतीने आयोजित चषक स्पर्धा व कला स्पर्धेतील समूहगान स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोल्ट होत्या.
समूहगान स्पर्धा सहा प्रकारच्या होत असून यामध्ये समूहगान, वाद्यवाजन, सुगमसंगीत, एकांकिका, शास्त्रीय नृत्य व लोकनृत्याचा समावेश असेल.
स्पर्धेत सुमारे सहा हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. आज व उद्या होणाऱ्या स्पर्धांमध्ये १ ली ते ४ थी, ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा तीन गटात स्पर्धा होणार असून ६२ शाळांमधील १२४० विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.
यावेळी उपमहापौर तथा कला, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, माधवी राजपुरे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रजाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षिका जयश्री साळवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
ReplyForward |