मुंबई |
मिरारोडच्या शिवार गार्डन परिसरातील रॉयल नेस्ट इमारतीमध्ये राहणाऱ्या स्टार प्लस या वाहिनीवरील “दिल तो हैप्पी हे” टीव्ही सिरीज मधील अभिनेत्री सेजल शर्माने आत्महत्या केल्याची घटना घडली. पहाटे 4 सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच त्यांना एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये “माझ्या आत्महत्येला मी स्वता जबाबदार आहे. असा उल्लेख तिने केला आहे’ पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. पुढील तपास कनकीया पोलीस करत आहे.
सेजल शर्मा 25 वर्षाची होती. अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं समोर आलंय. अनेक टीव्ही सिरीजमध्ये तिने काम केलं आहे. यामुळे कलाविश्वात या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. सेजलने दिल तो हॅप्पी जी मालिकेत सिम्मी खोसलाची भूमिका साकारली होती. यामध्ये ती मुख्य अभिनेता अंश बागरी उर्फ रॉकीची बहिण होती. ‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिका सेजल शर्माचा पहिला शो होता. सेजल मुळची उदयपुर येथील होती. तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री बनायचे होत. डान्स करणे तिची आवड होती. 2017 मध्ये ती मुंबईमध्ये आली होती. तेव्हापासून तिने ऑडिशन द्यायला सुरुवात केली होती.