पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तळ्यामध्ये मासेमारी करून उत्पन्न मिळविण्याचा नवा फंडा पालिका प्रशासनाने शोधून काढला आहे. त्या अंतर्गत संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान आणि निगडी येथील दुर्गादेवी उद्यान येथील दोन तळे भाडे तत्वाने देण्यात आली आहेत. त्यातून महापालिकेस वर्षाला एकूण 41 हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
या प्रकारे उत्पन्न मिळविण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.29) मंजुरी दिली. महापालिकेचे शहरभरात मोठ्या संख्येने उद्याने आहेत. तळे व खाणीचा विकास करून पालिकेने काही उद्याने विकसित केले आहेत.
संभाजीनगर येथील खाणीचा विकास करून पालिकेने बर्ड व्हॅली उद्यान उभारले आहेत. निगडीतील दुर्गादेवी उद्यानासही नागरिक दररोज मोठ्या संख्येने भेटी देतात. या दोन उद्यानाील तळे भाडे तत्वावर देण्यात येणार आहेत. दोनही तळे 3 वर्षे भाडे तत्वाने देण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मंजुरी दिली आहे.
तळ्यामध्ये मच्छबीज सोडून मच्छीमारी करण्यास हे तळे देण्यात येणार आहे. बर्ड व्हॅली उद्यानाचे तळे माऊली बेरोजगार संस्थेला प्रति वर्षी 21 हजार रूपये भाड्याने आणि दुर्गादेवी उद्यानातील तळे प्रति वर्षी 20 हजार रूपये भाड्याने स्नेहल मत्स उद्योगला देण्यास समितीने मान्यता दिली आहे. या दोन्ही एजन्सी मत्स पैदा करून त्याची बाजारपेठेत विक्री करून उत्पन्न मिळविणार आहे. त्या बदल्यास पालिकेस दरवर्षी 41 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.मात्र, हे उत्पन्न खूपच अल्प असल्याची टीका होऊ लागली आहे.