पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येते. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या 1 हजार 600 च्या वर पोहचली आहे.
पालिकेच्या फिल्ड सर्व्हलन्स टीमद्वारे शहरात घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. त्यात परदेशातून आलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेले आणि सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनचा सूचना दिल्या जात आहे.
विशेषत: परदेशवारी करून आलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. परदेशातून जाऊन आलेेले व त्यांच्या संपर्कात आल्याचा शोध घेतला जात आहे. त्यांना होम क्वारंटाईनचा सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या टीमद्वारे दररोज लक्ष ठेवले जाणार आहे. तो खरोखरच घरात राहत आहे किंवा नाही, हे तपासले जात आहे.
शहरात आतापर्यंत होम क्वारंटाईन झालेल्या नागरिकांचा आकडा 1 हजार 600 च्यावर गेला आहे. होम क्वारंटाईनचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीस पोलिस बंदोबस्तात ताब्यात घेऊन पालिकेच्या रूग्णालयात किंवा वसतीगृहात क्वारंटाईन केले जात आहे. त्यासाठी भोसरी रूग्णालयासह मोशीतील वसतीगृह आणि म्हाळुंंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे.