पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
दिल्लीत झालेल्या तबलिगी जमातच्या मेळाव्यास सहभागी झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 28 जणांपैकी 2 दोन जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या आता 3 झाली आहे.
दिल्लीतील धार्मिक मेळाव्यात संमेलनात सहभागी झालेल्या 23 जण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 5 नातेवाईक असे एकूण 28 जणांवर महपाालिकेच्या वासयीएम आणि भोसरीच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविले होते. त्यापैकी दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर पालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित 26 जणांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यावर पालिकेचे पथक देखरेख ठेवणार आहे.
शहरात आता कोरोना रूग्णांची संख्या 2 ने वाढून 3 झाली आहे. दरम्यान, 20 मार्च पर्यंत असलेल्या 12 कोरोना बाधीत रूग्णांपैकी 11 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.