पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयातवाजिद यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४२ वर्षाचे होते. किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे मागील अडीच-तीन महिन्यांपासून रुग्णालयातच होते. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून वाजिद व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.
किडनी आणि घशाच्या इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या वाजिद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचंही चर्चा होती. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. वाजिद खान यांना मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.