पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधित 98 नवे रूग्ण शुक्रवारी (दि.12) आढळून आले. त्यात 56 पुरूष व 42 महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 1 हजार 144 झाली आहे.
कोरोनाचे रूग्ण सांगवी, अजंठानगर, संत तुकारामनगर-भोसरी, वेलठिकानगर-थेरगाव, गुलाबनगर-दापोडी, साईबाबानगर-चिंचवड, नानेकर चाळ-पिंपरी, पवारवस्ती-दापोडी, श्रीदत्त कॉलनी-थेरगाव, काळेवाडी, संजय गांधीनगर-पिंपरी, नेहरूनगर, त्रिवेणीनगर, यमुनानगर, भिमनगर-पिंपरी, दत्तनगर-दिघी, जयभीमनगर-दापोडी, आनंदनगर, सिद्धार्थनगर-दापोडी, वैष्णवदेवी मंदिर-पिंपरी, चिखली, रमाबाईनगर, बौध्दनगर-पिंपरी, जाधववाडी-चिखली, मिलिंदनगर-पिंपरी, अंकुश चौक-निगडी, शिवतीर्थनगर-काळेवाडी, पोलिस कॉलनी-वाकड, जयमालानगर-निगडी, सुदर्शननगर-पिंपळे गुरव तसेच, अांबेडकर वसाहत-औंध, जुन्नर येथील हे रहिवाशी आहेत.
वायसीएम रूग्णालयात 526 जणांवर आणि पुण्यातील रूग्णालयात 22 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण 28 कोरोनाबाधित बरे झाले. त्यांना वायसीएम व भोसरी रूग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनातून बरे होणार्यांची एकूण संख्या 544 झाली आहे.
हे रूग्ण आनंदनगर, नेहरूनगर, साईनाथनगर-निगडी, महात्मा फुलेनगर, नानेकर चाळ-पिंपरी, मोरवाडी, पिंपळे गुरव, दत्तनगर, वाकड, दापोडी, सद्गगुरू कॉलनी-वाकड, नेहरूनगर, रूपीनगर, पवारवस्ती-दापोडी, रमाबाईनगर-पिंपरी, थरमॅक्स चौक येथील रहिवाशी आहे. आज 191 संशयितांना वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले.