पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोनाबाधित 74 जण बरे झाल्याने त्यांना वायसीएम व भोसरी रूग्णालयातून गुरूवारी (दि.25) डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्या 74 जणांना आज घरी सोडण्यात आले. ते सर्व नाशिक फाटा, कासारवाडी, समर्थनगर, नवी सांगवी, विठ्ठलनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, सिद्धार्थनगर, पवारवस्ती, गुलाबनगर, दापोडी, साईबाबानगर, बौद्धनगर, खंडोबा माळ, शिंदेनगर, संगमनगर, सांगवी, कस्पटेवस्ती, मुळेनगर, दिघी, सावंतनगर, दिघी, डिलक्स चौक, पिंपरी, भारतनगर, बौद्धनगर, धावडेवस्ती, पंचतारानगर, पाटील फ्लोअर मिल, दापोडी, अजिंक्यनगर, काळेवाडी, गणेशनगर, डांगे चौक, गवळीमाथा, चिंचवड गाव, रहाटणी, मोहनगर, तापकीर चौक, वैभवनगर, लक्ष्मणनगर, थेरगाव, स्वरा रेसिडन्सी, भोसरी, पंचशीलनगर, पिंपळे निलख, विद्यानगर, तालेरा रूग्णालय, मोरेवस्ती, दिघी, भारतमाता चौक, काळेवाडी, तुळजाभवानी कॉलनी, थेरगाव, निराधारनगर, थेरगाव, घरकुल चिखली, प्रेमप्रकाश टेपल, पिंपरी, कोंढवा, येरवडा, बोपोडी, कात्रज, केंद्र पाबळ, विजयनगर, पुणे येथील रहिवाशी आहेत. आतापर्यंत एकूण 1 हजार 468 जण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासांत एकूण 335 कोरोना संशयितांना वायसीएम व भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर, आज 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 478 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. एकूण 15 हजार 134 पैकी 12 हजार 383 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज 375 जणांना क्वारंटाईन करण्यात आले.