पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (दि.8) कोरोनाबाधित 7 जणांना उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, कोरोना पॉझिटिव्हचे 300 नवे रूग्ण आढळून आले. तर, 371 कोरोनाबाधित बरे झाले.
देहूरोड, किवळे येथील 40 वर्षीय महिला, काळेवाडीतील 80 वर्षीय पुरूष, घरकुल चिखलीतील 46 वर्षीय पुरूष, दापोडीतील 36 वर्षीय तरूण, पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीतील 49 वर्षीय महिला तसेच, पुण्यातील बावधन खुर्द येथील 68 वर्षीय महिला आणि धुळे येथील 66 वर्षीय पुरूषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाचे एकूण 111 बळी गेले आहेत.
आज आढळून आलेले कोरोनाबाधित 290 जण शहरातील आणि 10 जण शहराबाहेरील आहेत. वायसीएम, भोसरी, पालिका व इतर रूग्णालयात 1 हजार 880 जणांवर तर, पुण्यातील रूग्णालयात 14 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 622 वर पोहचली आहे.
शहरात 371 कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 3 हजार 759 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.
आज एकूण 990 कोरोना संशयितांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज 815 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर, 1 हजार 822 जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.