पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे सोमवारी (दि.20) 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, कोरोनापॉझिटिव्ह 680 रूग्ण शहरात आढळून आले. तसेच, कोरोनाबाधित 391 रूग्ण बरे झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले.
यमुनानगर, निगडी येथील 80 वर्षीय पुरूष, निगडी येथील 61 वर्षीय महिला, भोसरी येथक्षल 65 वर्षीय पुरूष, पिंपळे गुरव येथील 33 वर्षीय तरूण, खराळवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, चिंचवड येथील 51 वर्षीय पुरूष, पिंपरी येथील 49 व 52 वर्षीय 2 पुरूष, फुगेवाडी येथील 74 वर्षीय पुरूष, दापोडीतल 90 वर्षीय महिला, वल्लभनगर, पिंपरी येथील 76 वर्षीय महिला आणि रूपीनगर, निगडी येथील 61 वर्षीय पुरूष असे 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत शहरात एकूण 266 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11 हजार 936 झाली आहे. वायसीएम, पालिका व खासगी 3 हजार 262 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 2 हजार 917 कोरोना संशयितांचे घशातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. दोन 2 हजार 161 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 985 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. एकूण 391 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 7 हजार 660 झाली आहे.