- 721 जण कोरोनातून बरे
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत 14 पुरूष व 6 महिला असे तब्बल 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद मंगळवारी (दि.21) झाली. एकूण 563 कोरोनाबाधित रूग्ण सापडून आले. तर, 721 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
चिंचवड येथील 42 व 65 वर्षीय 2 पुरूष, भोसरी येथील 38 व 56 वर्षीय 2 पुरूष, पिंपरी येथील 51 व 57 वर्षीय 2 पुरूष, जुनी सांगवी येथील 52 व 84 वर्षीय 2 पुरूष, नेहरूनगर येथील 65 वर्षीय महिला, संत तुकारामनगर येथील 66 वर्षीय पुरूष, वल्लभनगर येथील 80 वर्षीय महिला, पिंपळे गुरव येथील 63 वर्षीय पुरूष, दिघी येथील 75 वर्षीय महिला, काळेवाडी येथील 73 वर्षीय पुरूष, दापोडी येथील 72 वर्षीय महिला, यमुनानगर येथील 42 वर्षीय पुरूष, ताथवडे येथील 58 वर्षीय महिला, कोथरूड, पुणे येथील 89 वर्षीय महिला, जांभे येतील 36 वर्षीय पुरूष, आणि जुन्नर येथील 54 वर्षीय पुरूष या 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 286 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12 हजार 477 झाली असून, वायसीएम, पालिका व खासगी रूग्णालयात 3 हजार 107 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकूण 721 कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण 8 हजार 417 झाली आहे. दोन हजार 761 कोरोना संशयितांच्या घशातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आज 1 हजार 508 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.