पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पुणे महापालिकेच्या वतीने मूळा व मुठा नदी पुनरूज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून वाकड ते बोपखेल असे 14 किलोमीटर अंतर वाहणार्या मूळा नदीच्या एका बाजूच्या पात्रासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पुणे पालिकेस तब्बल 7500 कोटी रूपये पुणे पालिकेस देणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी 340 कोटींच्या खर्चास पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पाचे काम पुणे पालिका करीत आहे. त्यांची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड ते बोपखेल या मूळा नदीच्या पात्रासाठी सुमारे 750 कोटी रूपये (भूसंपादन व भाववाढ खर्च वगळून) खर्च अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूने विकास करताना जागेच्या उपलब्धतेनुसार पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने काम केले जाणार आहे. तसेच, अनावश्यक बंधारे काढण्यात येणार आहेत. या कामात वाकड वायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या 8.80 किलोमीटर अंतर लांबीचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.
निविदा प्रक्रियेवरून वाद होऊ नये म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची संयुक्त निविदा समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात पुणे पालिकेचे आयुक्त अध्यक्ष असून, पिंपरी पालिकेचे आयुक्त उपाध्यक्ष आहेत. तर, पुुणे पालिकेचे मुख्य अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि पिंपरी पालिकेचे शहर अभियंता, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे सदस्य आहेत. तसेच, याच अधिकार्यांची विवाद पुनरावलोकन समिती (डिस्प्युट रिव्हूव कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. .