पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजर करण्यात आला. तिसरीतील आराध्या हिने नेमबाजी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक आणि दहावीतील श्रीनिधी पाटील हिने कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकण विद्यार्थ्यांनी केले. योगा, झुंबा, फॅन ड्रील, रिंग ड्रील, कवायत सादर केले. उत्कृष्ट योगा प्रात्यक्षिक सादर करणरर्या विद्यार्थी व योगा शिक्षक विश्वास मोहिते यांचा मुख्याध्यापिका डॉ. स्मिता पॅटरसन यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. धावणे आणि अडथळ्याची शर्यतील विजेत्यांना पदक देऊन गौरविण्यात आले.
मार्गदर्शन करताना शाळेच्या पुणे विभागाचे सरव्यवस्थापक डी. एस. जे. फ्रँकालीन म्हणाले की, खेळांमुळे व्यायाम होतो. शरीर बळकट होते. खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. मुख्याध्यापिका डॉ. पॅटरसन यांनी जीवनात शारीरिक शिक्षणाचे महत्त्व, क्रीडा व क्रीडा क्षेत्रातील ध्येय गाठण्याचे गमक सांगितले. उपमुख्याध्यापिका जॅसमिन मॅम यांनी आभार प्रदर्शन केले. कोमल त्रिवेदी व रुबीना सय्यद यांनी सुत्रसंचालन केले.