पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
नीमगाव केतकी, इंदापूर येथे झालेल्या विभागस्तर कुस्ती स्पर्धेमध्ये 110 किलो वजन गटात ग्रीक रोमन प्रकारात सिम्बॉयोसिस महाविद्यालयाचा स्वराज काळभोर याने विजेतपद मिळविले. त्यामुळे त्याची कोल्हापूर येथे होणार्या शालेय राज्यस्तर कुस्ती स्पर्धेसाठी पुणे विभागीय संघात निवड झाली आहे.
विभास्तर स्पर्धेत स्वराज याने पुणे जिल्ह्याचा अमन पारेकर याला 8-0 ने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पुणे शहराचा रुद्र लगड याच्यावर बायफॉलने विजय मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली. वडील राष्ट्रीय पैलवान राजेश काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तो आकुर्डी सराव करत आहे