पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध 15 पदांसाठी एकूण 387 जागांसाठी नोकरी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातील सोमवारी (दि.18) 21, मंगळवारी (दि.19) 31 आणि बुधवारी (दि.20) 43 असे एकूण 95 कर्मचार्यांना आजअखेर रूजू करून घेण्यात आले आहे.
पूर्वचारित्र्य वर्तणूक पडताळणी (पोलिस व्हेरीफिकेशन) आणि शारिरीक पात्रता तपासणी (मेडिकल फिटनेस सर्टीफिकेट) झाल्यानंतर पात्र कर्मचार्यांना टप्पाटप्पाने रूजू करून घेतले जात आहे. उमेदवाराची निवड यादी व प्रतिक्षा यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर 1 डिसेंबर 2023 ला प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांना पोलिस व्हेरीफिकेशन व मेडिकल फिटनेस सर्टीफिकेट बंधनकारक आहे. त्यासाठी तपासणीकरीता 5 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.