पिंपरी-चिंचवडमधील मराठा सर्वेक्षणास सुरूवा
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मंगळवार (दि.23) पासून सर्वेक्षण़ सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी अॅपमध्ये लॉगीग होत नसल्याने अनेक कर्मचार्यांना नोंदणीच करण्यात आली नाही.
घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी महापालिकेने एकूण 2 हजार कर्मचारी नेमले आहेत. त्यांना सोमवारी (दि.22) प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष सर्वेक्षणास आज सकाळपासून सुरूवात करण्यात आली. कर संकलन विभागाच्या 17 झोननुसार शहराचे तुकडे करून सर्वेक्षण करण्यात येत आहे. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशी जात असल्यास त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरून घेण्यात येत आहेत. त्यात तब्बल 182 पर्यायी प्रश्न आहेत. एकाच वेळी राज्यभरात नोंदणी सुरू झाल्याने कर्मचार्यांच्या मोबाईलवर लॉगीग होण्यास अधिक वेळ जात होता. तर, काहीचे लॉगीग झाले नाही. तर, काहींच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड झाले नाही. त्यामुळे त्या कर्मचार्यांना सर्वेक्षण करता आले नाही.