निर्भीड न्यूज –
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदासाठी आज (बुधवार, दि. 6 एप्रिल) महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत निवडणूक पार पडली. ही निवड बिनविरोध करण्यात आली.
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी नीलेश पांढारकर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयासाठी आशा सूर्यवंशी, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयासाठी शैलजा शितोळे, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयासाठी अरूण टाक, इ क्षेत्रीय कार्यालयासाठी श्रध्दा लांडे व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी मंदाकिनी ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. सहा क्षेत्रीय कार्यालयांवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम राखले आहे.