सोमनाथ तापकीर युवा मंचचा उपक्रम
तीन दिवस मोफत औषध फवारणी
सोमनाथ तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन
निर्भीड न्यूज –
जागतिक आरोग्य दिनानिमित्त काळेवाडी-नढेनगर येथील प्रभाग क्रंमांक ४७ मध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येत आहे. तीन दिवस ही फवारणी करण्यात येणार असून, बुधवार, दि. 6 एप्रिल रोजी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सोमनाथ तापकीर युवा मंचच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
काळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सुभेदार संजय मिरगुले, बबलू शेख, सोमनाथ विश्वकर्मा, सिद्धार्थ कटारिया, बाळु वाघमारे, आजिम पठाण, किशोर कसबे, सुरज पवार यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
सोमनाथ तापकीर या वेळी म्हणाले की, शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहते. मात्र या नदीत जलपर्णी वाढली आहे. नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे. या डासांचा त्रास होत आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून ही मोफत औषध फवारणी करण्यात येत आहे.