निर्भीड न्यूज
पिंपरी –
माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवारातर्फे वाढदिवसावर होणारा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांसाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनला 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 5) अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांच्या मित्रपरिवाराने वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्च टाळून राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत केली. दुष्काळग्रस्तांसाठी विविध प्रकारे मदत करणारे अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनला 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रकाशराव मीठभाकरे यांच्या हस्ते अमित गोरखे यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक शंकर जगताप, भाजप नेते सारंग कामतेकर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार आणि शंकर जगताप यांच्या मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते.