निर्भीड न्यूज –
जेष्ठ कामगार नेते स्व. शरद राव यांनी आयुष्यभर गोर गरीब कामगारांसाठी काम केले, अनेक लढे दिले शरद राव यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना श्रद्धांजली होईल असे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.
कष्टकरी कामगार पंचायत, आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने जेष्ठ कामगार नेते स्व. शरद राव याना पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृह येथे श्रद्धांजली वाहण्या साठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
कामगार नेते कैलास कदम यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या सभेला खासदार अमर साबळे, कष्टकरी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्याचे नेते बाबा कांबळे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, आर.पी आय चे बाळासाहेब भागवत, जनता दलाचे प्रताप गुरव, सामाजिक कार्यकते शहाबुद्दीन शेख, खजाभाई शेख, घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी बाबा कांबळे, कैलास कदम, एकनाथ पवार यांनी मनोगत व्यक्त केले आणि श्रद्धांजली अर्पण केल .
एकनाथ पवार म्हणाले शरद राव यांनी कामगारांनसाठी दिलेला लढा विसरता येणार नाही एक प्रश्न हातात घेतला कि त्याच्या वर कस काम करावं हे शरद राव ह्यांच्या कडून शिकावे.
बाबा कांबळे म्हणाले स्व. शरद राव यांनी संघटीत आणि असंघटित अस्या दोन्ही घटकांन मध्ये काम केले आहे शरद राव हे या दोन्ही घटकांमध्ये काम करणारे एकमेव नेते होते रिक्षा चालक, फेरीवाले, कंपनी कामगार, महापालिका कामगार यांच्या साठी शरद राव यांनी फार मोठे काम केले आहे