निर्भीड न्यूज –
– राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी खाडे यांचे खंदे समर्थक भाजपमध्ये
भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत पिंपळे गुरव येथील कार्यालयात राष्ट्रवादीच्या विजय जगताप व सुजीत जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत भाजपमधे प्रवेश केला
यावेळी भाजप नेते सचिन काळभोर, भाजप अल्पसंख्याक आघाडी शहर उपाध्यक्ष रज्जाक सोलापुरी, प्रभागअध्यक्ष किशोर हातागळे, अनुसुचित मोर्चा सरचिटणीस सचिन वाघमारे, अरुण जोगदंड, राम उदागे, विलास थोरात हे भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
राहुलनगर सेक्टर नं २२ निगडी येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी खाडे यांचे खंदे समर्थक म्हणुन विजय जगताप व सुजीत जाधव यांची ओळख आहे.
एकनाथ पवार म्हणाले की, येत्या काळात विविध पक्षाचे कार्यकर्ते भाजपामधे प्रवेश करणार असुन त्याची मोर्चे बांधणी स्थानिक पदाधिकारी करत आहे या अगोदर राष्ट्रवादीचे रज्जाक सोलापुरी यांना पक्षात घेवुन सेक्टर २२ येथील अल्पसंख्यांक समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत.