निर्भीड न्यूज –
ताथवडे-हिंजवडी येथील संत तुकाराम महाराज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी वसंत पवार तर, उपाध्यक्षपदी हनुमंत हुलावळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.
ताथवडे – हिंजवडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही सहकारी क्षेत्रातील मोठी संस्था आहे.1990 मध्ये या सहकारी सेवा सोसायटीची स्थापना झालेली असून आज पर्यंत या संस्थेने सभासद हित समोर ठेवत कार्य सुरू ठेवले आहे. सुमारे 595 सभासद या सोसायटीत असून 13 संचालक आहेत.
अध्यक्ष वसंत पवार हे एक प्रगतशील शेतकरी असुन गावच्या विकासकामात नेहमी त्यांचा मोलाचा वाटा असतो. ग्रामपंचायत असताना वसंत पवार यांच्या पत्नी मिनाक्षी पवार यांनी सरपंच पदाची सुत्रे स्वकिारली होती.
नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत पवार म्हणाले की, सर्व संचालक, ग्रामस्थांना बरोबर घेऊन आगामी काळात सोसायटी व सभासदांच्या हिताचेच निर्णय व योजना राबविणार असल्याचे यांनी सांगितले आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील मान्यवरांनी पुढाकार घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. एम. नरुटे यांनी काम पहिले.
वसंत पवार व हनुमंत हुलावळे यांच्या या निवडीमुळे परिसरातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.