निर्भीड न्यूज –
गौराईचे चैतन्यमय सजावटीचे बक्षिष वितरण नुकतेच खराळवाडी येथे करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बाल कल्यान समिती सभापती नगरसेविका गीता मंचरकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
लक्ष्मीहार, पोहेहार, बोरमाळ, ठुशीचे कानातले, ठुशी, छल्ला, मेखला, बाजूबंद (वाकी), नथ, पैसाहार, बांगड्या, कंबरपट्टा, मुकुट, पुतळी, मोहनमाळ, तोडे, दुहेरी हार, शाही हार या अलंकारांनी गौरींचे रूप अधिकच खुलून दिसत होते. महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावर दिसून येथ होते.स्पर्धेमध्ये हजारो महिलांनी सहभाग घेतला होता.