निर्भीड न्यूज –
काही दिवसांपासून शहरातील सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने शहरवासीय हैराण झाले होते. मात्र बुधवार, दि. 6 एप्रिल रोजी दुपारी पावसाच्या हलक्या सरींनी पिंपरी-चिंचवड शहरात हजेरी लावली. अल्प प्रमाणात झालेल्या या पावसामुळे शहरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
कडक उन्हामुळे शहरातील रस्ते दुपारी काही प्रमाणात ओस पडत असल्याचे चित्र दिसते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत आहे.
बुधवार, दि. 6 एप्रिल रोजी दुपारी ढगाळ वातावरण झाले. त्यासह हवेनेही जोर धरला. यातच पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला.