अभिनेता प्रभास आणि राणा दुग्गुबत्ती यांच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवरील जवळपास सर्व रेकॉर्डवर नाव कोरले आहे. आता आणखी एक रेकॉर्ड ‘बाहुबली’ने रचला आहे. होय, गेल्या काही काळाचा विचार केल्यास एकाही चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर शंभर दिवस पूर्ण केले नाहीत. परंतु एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवर शंभर दिवस पूर्ण करीत इतिहास रचला आहे.
हा रेकॉर्ड रचताना ‘बाहुबली-२’ने दिग्गज सेलिब्रिटींच्या चित्रपटांचा सामना केला. त्यामध्ये सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’, अर्जुन कपूरच्या ‘मुबारका’ आणि शाहरूख खानचा नुकताच रिलीज झालेला ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘बाहुबली-२’चा प्रभाव ऐवढा होता की, प्रेक्षकांनी इतर चित्रपटांना फारसा थारा न देता ‘बाहुबली’ला पसंती दिली. ‘बाहुबली-२’ रिलीज झाल्याच्या दुसºया आठवड्यानंतर रिलीज झालेले चित्रपट तर कदाचित प्रेक्षकांना आठवतही नसतील, कारण हे चित्रपट केव्हा रिलीज झाले अन् चित्रपटगृहातून गेले हे प्रेक्षकांना कळालेच नाही. कारण त्यांच्यावर केवळ ‘बाहुबली-२’ची धूंद होती अन् आहे.