निर्भीड न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कजवळील जागेत तारांगण प्रकल्पाचे काम सुरू आहे. तारांगण उभारणीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची नुकतीच बैठक झाली.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, खगोल शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे, मुंबई येथील नेहरु तारांगणचे संचालक अरविंद परांजपे, शहर अभियंता महावीर कांबळे, कार्यकारी अभियंता मिलिंद कपिले, कार्यकारी अभियंता फारुख शेख आदी या वेळी उपस्थित होते.
महापालिकेचे सहशहर अभियंता, तारांगण प्रकल्पाचे समन्वयक प्रवीण तुपे यांनी प्रकल्प प्रगतीचा आढावा विषद केला. तारांगण प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींवरही या वेळी चर्चा करण्यात येऊन प्रकल्पाबाबतचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले.