निर्भीड न्यूज –
आर्य समाजच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आर्य समाजच्या पिंपरी येथील शगुन चौकातील केंद्राच्या सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत.
‘आर्य समाज आणि आंबेडकर’ या पुस्तकाचे वाचन, आंबेडकरांसंबंधिच्या पुस्तकांचे प्रदर्शन, चर्चासत्र यासह साईनाथ पुण्ये यांचे या वेळी व्याख्यान होणार आहे.
दत्ता सूर्यवंशी, दिगंबर रिध्दीवडे, महेंद्र कांबळे, प्रमोद वाघमैतर, राजू बनसोडे आदींनी संयोजनात पुढाकार घेतला आहे. गुरुवार, दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 ते रात्री आठ दरम्यान हे विविध कार्यक्रम होणार असून, या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.