निर्भीड न्यूज –
औंध येथील राघवेंद्र भीमराज घोरपडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन केले आहे. उपमुख्यकार्यकारी वर्ग – 1 पदासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे.
घोरपडे याबाबत म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. आता ती पूर्ण करता येईल. नियोजनबध्द पध्दतीने अभ्यास करून या परीक्षेत यश संपादन केले. दहावीत 91 टक्के, बारावीत 84 टक्के गुण मिळविले होते; तसेच संगणक अभियांत्रिकी ही पदवी विशेष श्रेणीत मिळविली.
घोरपडे यांचे वडील भीमराज हे कृषी अधिकारी, आई शोभा या पुणे महापालिका शाळेत शिक्षिका आहेत. या यशाबद्दल राघवेंद्र घोरपडे यांचे पुण्याचे नगरसेवक बाबूराव चांदेरे, रंजना मुरकुटे, अशोक मुरकुटे, संगीता गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.