निर्भीड न्यूज –
दुष्काळामुळे राज्यभरात पाणीटंचाई आहे. बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील श्री काळभैरवनाथ मंदिर देवस्थानासही या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे पिंपरी-चिंचवड येथील नगरसेवक कैलास थोपटे आणि त्यांच्या परिवाराकडून पाणीपुरवठ्यासाठी या देवस्थानास टँकर देण्यात आला.
काळभैरवनाथ उत्सव समितीचे अध्यक्ष देवा नखाते, सुदाम नखाते, माजी अध्यक्ष लाला नखाते, विश्वनाथ नखाते, वस्ताद चांगदेव नखाते, हभप राजाभाऊ भोसले, शामराव नखाते, बापूसाहेब झांबरे, विकास थोपटे यांच्यासह लोणी भापकर येथील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.