निर्भीड न्यूज –
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार सेल शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील कुंजीर यांचा पिंपळे सौदागर येथे सत्कार करण्यात आला. सतीश काटे मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे, यशदा रिऍ़ल्टीजचे चेअरमन उद्योजक संजय भिसे, वसंत काटे, उद्योजक अनिल काटे, सतीश काटे, सामाजिक कार्यकर्ते विकास काटे, अशोक काटे, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव शंकर चोंधे, संतोष काटे, तात्या शिनगारे, गुलाब काटे, हर्डीकर गुरुजी आदी या वेळी उपस्थित होते.
संजय भिसे या वेळी म्हणाले की, उत्कृष्ट निवेदक आणि सुत्रसंचालक म्हणून कुंजीर यांची ओळख आहे. स्वराज नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजूंना त्वरित कर्जपुरवठा करून सहकार्य केले. ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यातही त्यांना यश आले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार सेल शहराध्यक्षपदी स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांची नुकतीच निवड करण्यात आली.
सुनील कुंजीर म्हणाले की, सहकार सेलच्या माध्यमातून विविध संस्थांच्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येईल. सहकार क्षेत्राच्या वाढीसाठी आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक घटकाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.