निर्भीड न्यूज –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने शहरात मिरवणुकांचेही आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौकात विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत. या स्मारकाला हजारो जण भेट देत असून, बाबासाहेबांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारीत विविध पुस्तकांची विक्रीही येथे होत आहे. भव्य रांगोळीही काढण्यात आली आहे.
हजारो जण या स्मारकाला भेट देत असल्याने विविध संघटनांकडून येथे अन्नदान, पाणी वाटप करण्यात येत आहे. दुपारी चारनंतर या चौकातील गर्दीत मोठ्याप्रमाणात भर पडणार आहे. शहरातील विविध भागांतून मिरवणुका काढण्यात येणार असून, पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, नेहरुनगर आदी भागांतील मिरवणुका सायंकाळनंतर या चौकात दाखल होणार आहेत.