मुंबई/ निर्भीडसत्ता न्यूज –
आलियाने अप्रतिम सौंदर्य व उत्तम अभिनयानं बॉलिवूडची उगवती ‘स्टार’ आलिया भट्ट हिने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ‘वयाच्या नव्वदीतही मी अभिनय करत राहीन,’ असे तिने म्हटले आहे. अल्पावधीतच स्वत:चा ‘फॅन क्लब’ निर्माण करणारी बॉलिवूडची उगवती ‘स्टार’ आलिया भट्ट हिनं तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का तिने दिला आहे. ‘वयाच्या नव्वदीतही मी अभिनय करत राहीन,’ असं तिनं म्हटलं आहे.
सलमान आणि शाहरूखसोबत कधीकाळी काम करणाऱ्या नट्या हल्ली चित्रपटात दिसत नाहीत, असं तिला विचारलं असता तिनं ही इच्छा बोलून दाखवली. ‘बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींचं करियर कमी असतं हे खरं आहे. मात्र, आता ट्रेंड बदलतो आहे. अभिनेत्रीही प्रदीर्घ काळ मोठ्या पडद्यावर दिसू लागल्या आहेत,’ असं ती म्हणाली.