बाराखडी एन्टरटेनमेंट्स आयोजित “चला हवा येऊ द्या” विशेष प्रयोगाला युके तील रसिकांचा जोरदार प्रतिसाद
निर्भीडसत्ता न्यूज –
झी मराठी वाहिनेवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या विश्व दौऱ्यातील दुसरे पर्व असलेल्या लंडन दौऱ्यातील लाईव्ह शो रविवारी १२ नोव्हेंबर ला लंडन येथील ट्रॉक्सी थिएटर मध्ये उत्साहात पार पडला. या शो ला लंडनवासीयांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. यासाठी युनायटेड किंगडम (यु के) मधील “बाराखडी एंटरटेनमेंटस्” ने पुढाकार घेतला होता. ‘ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.
‘झी मराठी’ ची ‘चला हवा येऊ द्या’ ची गाजलेली टीम या शो मध्ये सहभागी झाली होती. यामध्ये डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे या कलावंतांचा समावेश होता.
त्यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे फारूळे बाई, पुणेरी बाई, प्रवीण परडे ह्यांनी प्रेक्षकांना खूप हसवलं “माझ्या नवऱ्याची बायको” ह्या सध्या गाजत असलेल्या मालिकेतील कलाकार म्हणजेच अभिजित खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर ह्यांच्याशी मनमुराद गप्पा देखील पार पडल्या.
युनायटेड किंगडम मधील मराठी रसिकांसाठी बाराखडी एन्टरटेनमेंट्स च्या भावी उपक्रमांबद्दल डॉ निलेश साबळे यांनी शुभेच्छा दिल्या .
अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे ह्यांनी चांगली संहिता, नवीन प्रयोग आणि व्यावसायिकता ह्या तीन महत्वाच्या निकषांवर भर दिला आणि प्रतिसाद दिलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले . रसिकांची अशी साथ नवीन संकल्पनांना लंडन , युनायटेड किंगडम मध्ये आणायला नक्कीच प्रेरणादायी ठरते असे हि त्यांनी नमूद केले.