निर्भीड न्यूज –
काळेवाडीतील राजवाडेनगर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. रामजन्म सोहळा या वेळी आयोजित करण्यात आला होता.
रामजन्मोत्सव सोहळ्यात परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. राम जन्माचा पाळणा, भक्तीगीत यासह या वेळी भजनही झाले.
सोमनाथ तापकीर मित्र परिवाराकडून नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले. सायंकाळी महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.