निर्भीड न्यूज –
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेसतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि अन्नदान करण्यात आले.
गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शहर काँग्रेसतर्फे मोफत रुग्वाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौकात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते; तसेच जयंतीनिमित्त लाखो नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या चौकात गर्दी केली होती. या नागरिकांसाठी या चौकात काँग्रेसतर्फे अन्नदान करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक सदगुरु कदम आदी या वेळी उपस्थित होते.