निर्भीड न्यूज –
माय, गाय, भाषा पुरस्कृत मायबोली विकास मंचतर्फे खान्देश स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विविध पुरस्कारांचे या वेळी वितरण करण्यात येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. धुळे येथील खासदार सुभाष भामरे अध्यक्षस्थानी राहतील. खासदार अमर साबळे स्वागताध्यक्ष आहेत. खासदार श्रीरंग बारणे, नंदूरबार येथील खासदार हिना गावित, जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरीचे आमदार गौतम चाबूकस्वार, नाशिक येथील के. के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य भूषण कर्डिले, टाटा मोटर्स कंपनीचे निवृत्त अधिकारी बापूसाहेब पिंगळे, शिवसेनेचे धुळे शहर प्रमुख सतीश महाले, हिरा उद्योग समूहाचे रवींद्र चौधरी, चाळीसगाव नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता राजेंद्र चौधरी, नंदुरबार येथील उद्योजक विजय चौधरी, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मनसेचे गटनेता अनंत को-हाळे, भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक बाळासाहेब गवारे, भाजपाच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नामदेव ढाके, शिरपूर येथील साहित्यीक डॉ. फुला बागुल, पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक डी. टी. पाटील, शिवशक्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष परबत मराठे, पिंपरी-चिंचवड येथील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि उद्योजक सुरेश शिरुडे, अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेचे पिंपरी-चिंचवड महानगर शाखाध्यक्ष विजय शिनकर, उद्योजक रजनिश पाटील, उद्योजक पी. टी. चौधरी, सेवा विकास बँकेचे संचालक चंद्रशेखर अहिरराव, सुवर्णकार समाजाचे दीपक सोनार, उद्योजक रवींद्र कोल्हे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
मंचतर्फे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रशांत भीमराव पाटील यांना मायबोली भूषण पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे. प्रशांत पाटील यांचे मुळगाव साक्री आहे. पिंपरी-चिंचवड येथे प्रचिती पब्लिसिटी या नावाने त्यांची जाहिरात कंपनी आहे. ‘खान्देश वेध’ या साप्ताहिकाचे ते मालक आणि संपादक आहेत. यासह प्रशांत पाटील यांची साक्री येथे प्रचिती इंग्लिश मीडियम स्कूल आहे.
अशोक यादव यांना मायबोली गोशाळा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कुस्तीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पै. विजय चौधरी याचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
बडाबाई केरु ढमाले, अनुसया नामदेव पिंगळे, इंदिरा मनोहर कुलकर्णी गिरीजाबाई धोंडू चौधरी, रेशमा तानकू बोरसे, यमुना दगडू लोहार, शकुंतला बाळासाहेब घोरपडे, मुक्ता आनंदा सैंदाणे, लीला भिका ब्राह्मणकर, शकुंतला गोपीचंद पाटील, सुलोचना प्रल्हाद झोपे, यमुना लोटन खैरनार, शकुंतला पांडुंरंग जाधव, रुक्मिणी भीमराव जाधव यांचा आदर्श माता म्हणून या वेळी सन्मान करण्यात येणार आहे.
मायबोली विकास मंचचे अध्यक्ष दिलीप चौधरी, दिलीप पाटील, मधुकर चौधरी, प्रा. उदय पाटकर, गोविंद चौधरी, महेंद्र पाटील, अनिल सोनार, किरण चौधरी, कैलास मोरे, टी. एस. वाघ, गणेश राजपूत, अमोल आहेर, किरण बाविस्कर, अजय जाधव, छोटू कोके यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.