निर्भीडसत्ता न्यूज –
आपल्या सुरक्षेची काळजी सुरुवातील स्वतःच्या पातळीवर घेतली तर मुली स्वतःचे 90 टक्के संरक्षण करु शकतात. हेच शौर्य या उपक्रमातुन आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
महिला सुरक्षिततेसाठी शौर्य या उपक्रमाचे चिंचवड येथील एटीएसएस महाविद्यालयात परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिंपरी पोलीस ठण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सोनीगरा ज्वेलर्सचे दिलीप सोनीगरा, शौर्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक अमर मनेरीकर, पकल्प सल्लागार शिर्ले मेनेझेस, एटीएसस महाविद्यालयाचे प्राचार्य अरुणा देऊसकर ,विजया केसकर शिक्षक व विद्यार्थि उपस्थित होते.
यावेळी गणेश शिंदे म्हणाले की, मुलींच्या सुरिक्षततेसाठी पोलीस यंत्रणा सदैव सज्ज आहे. मात्र आपल्या सोबत दुर्घटना होऊ नये यासाठी मुलींनीही सतर्क राहणे गरजेचे असते. यामध्ये मुलींनी त्यांच्या सिक्स सेन्सचा अधीक वापर करावा, कारण मुलींमध्ये ती क्षमता असते की कोण आपल्याशी योग्य वागत आहे किंवा कोण आपला गैर फायदा घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या सुरिक्षतेतासाठी पुढील काही गोष्टी पाळल्या तर तुम्ही सुरक्षीत राहू शकता.हेच शौर्यच्या माध्यानमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
शौर्यच्या माध्यामातून निगडी तो चिंचवड, प्राधिकरण ते पिंपळे सौदागर या टप्प्यात महाविद्यालयांना भेटी देऊन उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच मुलींसाठी 9146123381 हा क्रमांक 24 तास उपलब्ध असणार आहे. मुशात ऐकणे, सुरक्षा देणे, सतर्क करणे, कारवाई करणे, व त्या गोष्टीचा पाठपुरावा करणे या गोष्टीच्या अधारावर शौर्य काम करणार आहे. हेल्पलाईन बरोबरच समुपदेशन केंद्र उभारले जात आहे ज्यामध्ये मुलींना मानसोपचार तज्ज्ञ सोमवार ते शनिवार सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत तर रविवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत तुम्ही मानोसोपचार तज्ज्ञाना भेटू शकत, असे शिंदे यांनी सांगितले.
मुलींनीही त्यांच्या मनातील शंका परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांना विचारल्या व यावेळी शिंदे यांनीही शंकाचे निरसन करत पोलीस सदैव तुमच्या सोबत असल्याचा विश्वास विद्यार्थिंनीना दिला.