निर्भीडसत्ता न्यूज –
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे गुरुवारी (दि. २८) ‘कळी खुलताना’ या कार्यक्रमाव्दारे काळभोरनगर महापालिका शाळेमधील मुलींना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांनी मार्गदर्शन केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या फर्स्ट लेडी वसुधा गावडे, डॉ. मानसी पाटील, वैजयंती आचार्य, महेश ढोले आदी उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, ती कशी येते, समस्या काय याबाबत विद्यार्थीनींना सोप्या शब्दात सांगितले. विद्यार्थीनींनी देखील मनातील शंका डॉ. पाटील यांना मनमोकळ्यापणे सांगितल्या.
मुली किशोरवयात प्रलोभनांना कशा बळी पडतात, बचाव कसा करावा, स्वसंरक्षण का गरजेचे आहे, याचेही मार्गदर्शन डॉ. पाटील यांनी केला. शिक्षिका मंजुशा टिळेकर यांनी आभार मानले.