निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका स्वच्छतेत अव्वल येण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहेत. पालिकेबरोबर शहरातील नागरिकांनी आपल्या व शहराच्या सदृढ आरोग्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हावे. जास्तीत जास्त अॅप डाऊनलोड करावेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासीयांना केले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात केलेल्या स्वच्छता विषयक कामांचे सर्व्हेक्षण ४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू व महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅन्ड अँबिसिटर अंजली भागवत, सहआयुक्त दिलीप गावडे आदी उपस्थित होते.
अजंली भागवत म्हणाल्या, कच-यासंदर्भात राष्ट्रीय पुरस्कार आपल्या शहरातील रोझलॅडसारख्या सोसायटीला मिळाला. हे शहरासाठी मॉडेल असून आपणही स्वच्छतेच्या या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. पालिकेने कितीही नियम, दंड लावले, तरी प्रत्येक शहरावासीयांनी ठरविल्याशिवय स्वच्छता शक्य नाही. आपण घरात कचरा जिरविणे. आसपास स्वच्छता ठेवणे. फेरीवाले, पथारीवाल्यांना स्वच्छतेचे आवाहन करावे. अधिकाधिक नागरिकांनी अॅप टाऊनलोड करून कचरा, स्वच्छतेबाबत पालिकेकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन भागवत यांनी शहरवासीयांना केले.