निर्भीडसत्ता न्यूज –
आपण पोलिसांमुळे सुरक्षित आहोत ही भावना प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये रूजली पाहिजे. पोलीसांबद्दल समाजामध्ये आदर असला पाहिजे. असे प्रतिपादन पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने गजानन चिंचवडे बोलत होते. या वेळी चिंचवडगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पोलीस मित्रांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक (गुन्हे) विनायक साळूंके, प्रदेश कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल राऊत, प्रदेश संपर्क प्रमुख हरिष मोरे, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष भावेश दाणी, शुभम चिंचवडे, पोलीस काॅन्स्टेबल विठ्ठल मदने, सुनील मोरे आदी या वेळी उपस्थित होते.
अध्यक्ष,डाॅक्टर सेल पिंपरी चिंचवड डॉ. आशिष सोळंकी, अध्यक्ष, औद्योगिक सेल पिंपरी चिंचवड प्रसन्न शेट्टे, अध्यक्ष, भोसरी विधानसभा, व्यापार आघाडी किर्तीभाई शहा, अध्यक्ष, पिंपरी विधानसभा, व्यापारी आघाडी, महेश साफारीया, अध्यक्ष, चिंचवड विधानसभा व्यापारी आघाडी अतुल मोडासरा, सेक्रेटरी,चिंचवड विधानसभा,व्यापारी आघाडी कपिल जेठवा, अध्यक्ष, चिखली विभाग, व्यापारी आघाडी संजय लुणावत, अध्यक्ष, आकुर्डी विभाग मुकेश चुडासमा, संघटक, चिंचवड विधानसभा विनीत शहा, सेक्रेटरी, चिंचवड ब्लाॅक संतोष कांबळे, संघटक, पिंपरी चिंचवड सुभाष मालुसरे, सरचिटणीस, पुणे जिल्हा किरण गांधी अध्यक्ष, चिंचवडगाव, व्यापारी आघाडी, राजेंद्र चौधरी, खजिनदार, चिंचवड विधानसभा भावेश पांचाल यांची विविध पदांवर यावेळी नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भावेश दाणी यांनी केले तर आभार गोपाल बिरारी यांनी मानले.